ध्यास चालण्याचा
ध्यास चालण्याचा
होईल सगळं व्यवस्थीत
फक्त थोडसं धीराने घे
एकटे वाटणार नाही तुला
स्वःतचाच हात हातात घे
हा मनाचा संपेल त्रास
एकटच थोडसं चालून घे
बुद्धी थकेल मनासमोर
दुःख मनाचे बुध्दीसोबत वाटून घे
दुसऱ्यांकडून जेव्हा दुखावेल तुझे मन
तुच त्यांन्या समजून घे
जेव्हा कोणाची सोबत नसेल तुला
स्वतःच्याच कुशीत रडून घे
मार्गातअसतील भरपूर काटे
सुविचारानी ते दूर करून घे
अंधारात हळूहळू नकारात्मकतेकडे वाहशील
सकारात्मकतेची पणती लगेच पेटवून घे
मनमोकळे बोलायला भेटणार नाही कोणी
स्वताःशीच भरपूर बोलून घे
अनोळखी असेल प्रत्येक वाट
विचारपुर्वक निर्णय घे
येई कधीतरी खूप राग
संयमाने तो वीझवून घे
चुकीच्या लोकांना जर लावलास जीव
त्रास तुलाच होणार सहनही करून घे
अनुभव लोकांचे येतील खुप
अनुभवातून खुप सारं शिकून घे
विजय नेहमी सत्याचाच होतो
सत्याच्याच वाटेवर चालून घे
रंग भेटतील जेव्हा नव्याने
त्यात तू रंगून घे
प्रत्येकवेळी होत नाही स्वप्ननाचा चूरा
हिताचे स्वप्न पाहून घे
आवघड असेल जरी प्रत्येक वाट
हिंमतीने सुरुवात करूनघे
कुटुंबाचे प्रेम नेहमी भेटेल
त्याच्यातच जीवन समजून घे
सुखाची असेल प्रत्येक पहाट
चालण्याचा फक्त ध्यास .
