STORYMIRROR

Shashikant Shandile

Romance Classics

2  

Shashikant Shandile

Romance Classics

धुंदीत वाहतांना ...........

धुंदीत वाहतांना ...........

3 mins
2.5K


धुंदीत वाहतांना हरवून भान होतो

ती ओढ होती कसली मी बेभान होतो

आज वाटते ते अनोळखेच स्वप्न

स्वप्नाच्या जगाशी मी अनजान होतो...

मी लागलो वाहाया मज पोहता न येई

डुबण्या जणू मलाही तेव्हा होती घाई

कुठे जाण होती त्या गोड कंटकांची

रुतवून घेतले जे खोट्याच प्रेमापाई...

तो काळही अचानक रडवून आज जातो

जपलेल्या आठवणींनी भरून उर येतो

उधळून सारे स्वप्न काढलेत नशिबाने

पुन्हा नव्याने तुटण्या स्वप्नांचा पूर येतो...

नको मला तो आता त्या नजरेचा इशारा

पुन्हा कशाला शोधू तो वाहता किनारा

भिजवून घेतले मी हे अंग आसवांनी

सावरून आता घेतो हृदयातला पसारा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance