STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Romance

4  

Meenakshi Kilawat

Romance

धुंद होऊनी जगायचे

धुंद होऊनी जगायचे

1 min
445

स्वप्न पाहता चहूकडे 

ती माझी नयने जेव्हा

तुजलाच सख्या शोधत होती

नाही दिसला तेव्हा।। 


नव्हता कधी सोबत माझ्या 

भासच होई अंती 

विचार करता माझी मजला

लाजच येई भलती।।


नव्या स्वप्नात उगाच पडले

तुझ्या प्रेमात तिथे

वाटे मजशी मनात माझ्या 

जागत असते इथे।।


समोर ये तू स्वप्नातुनी

सखी पुरे हा गुन्हा

करणार किती कर बहाणे

येऊ नकोस पुन्हा।। 


नाही तर ही बंद करावे

स्वप्नामधले गाणे

रोजचेच हे सतावणे अन

प्राय: तुझे येणे जाणे।।


स्वप्नातसुद्धा नाही माझी 

अशी वागशील राणी

माझा मी ना राहिलो अाता

तुझा झालोय सजणी।।


 -


श्वासातला सुगंध होऊनी 

प्रितीच्या मस्त उबेत डुंबायचे 

वेडे होऊनी या रानोमाळी 

चिंब होऊनी हिंडायचे...


नकळत हृदयात दोघांनी 

एकत्रच हसुनिया शिरायचे 

हृदयात पक्के स्थान मांडुनी

असे धुंद होऊनी जगायचे...


स्वप्नात वेदनांचा हा उतारा

डोळ्यात साथीने उतरायचे

पाझरणाऱ्या या अश्रुंमध्ये

सप्तरंगी इंद्रधनू सजवायचे...


केसांमधुनी पाठीवरूनी 

मंद झोताने ओघळायचे

रोमछिद्रे ही अंगावरची

थेंब थेंब अलगद साठवायचे...


वाऱ्याला श्वासात कवटाळूनी 

शिखरावरती उंच भरारी घ्यायची 

कुशीत ढगाच्या शिरकाव करूनी

दामिनीसम चमकुनिया तळपायचे...


पाऊस अन् मी पक्के मित्र 

मज पाऊस व्हायला आवडायचे

भिजुन बरसायचे सोबत मनसोक्त

अलगद पावसावरच रूळायचे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance