STORYMIRROR

Rajshree Vaishampayan

Inspirational Others

3  

Rajshree Vaishampayan

Inspirational Others

देवदूत

देवदूत

1 min
247

नुसत्या कल्पनेनं ज्याच्या आम्हास वाटते भीती

त्याच्या बरोबर लढा द्यायचे बळ आहे तुझ्या हाती..

अख्ख्या विश्वावर कोसळलेल्या ह्या संकटात

तूच आहेस आमच्या सामान्यांचा भक्कम सोबती..

आपलं काय होईल हा विचार कधीच शिवत नाही तुला

आमचा ईलाज वेळेत व्हावा इतकचं असतं तुझ्या मनी..

काळजी असते तुला तुझ्या घरच्यांची देखील

पण म्हणून कधी घेत नाहीस एक पाऊल ही मागे..

उलट सांगून निघतोस घरातून नका करू माझी काळजी

सुखरूप परत घरी येईन हो मी नक्की..

सेवाभाव बघता तुझा मन आमचे भरून येतं

कारण घेतलेली शप्पथ तू जीवापाड जपतोस..!

तुझ्यामुळे वाटतं ह्या जगात देव अजून आहे खरा

म्हणून तर डॉक्टरांच्या रुपात आम्हाला देवदूत भेटला !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational