माणुसकीचे रंग हजार
माणुसकीचे रंग हजार
1 min
443
जिथे जात धर्मा पलीकडे माणूस भेटी माणसाला
त्याच पुण्यस्थळी अंकुरे माणुसकीचे बीज जाणा
ना सापडे ही बाजारी न मिळे विकत सहज
ओळखावी खूण हीची जिव्हाळ्याच्या शब्दात
डोळे जेव्हा पाणावती दुसऱ्याच्या दुःखात
चिंतेत असता अलवार फिरणारा तो मायेचा हात
घड्याळाचे काटे न बघता
प्रसंगी दिलेली ती मोलाची साथ
उमगे ज्याला आयुष्याचे खरे सार
तोची अनुभवू शकेल माणुसकीचे रंग हजार!
