मायेची सावली
मायेची सावली
1 min
221
बाहेरच्या जगात कसं वागावं तू शिकवतेस
थोडं घाबरत थोडं मन घट्ट करत
अनुभवाच्या शाळेत आमचा प्रवेश करून देतेस...
इतकं सोप्प जरी नसलं इथे निभाव लागणं
शिकवण तुझी पदोपदी मायेची सावली बनून चालते..!
भटकंती करताना येतात बरेच चांगले वाईट अनुभव
मग मात्र दमुन भागुन जेव्हा घरी परत येते
कुशीत तुझ्या आल्यावर सार जग हे विसरते
मायेच्या सावलीत तुझ्या क्षणभर विसावा मी घेते..!
