STORYMIRROR

Rajshree Vaishampayan

Others

4  

Rajshree Vaishampayan

Others

आई

आई

1 min
322

मायेच्या पंखात तुझ्या 

सुरक्षित आमचं बालपण ठेवतेस 

निरागसता जपत आमची.. 

लहानाचं मोठं करतेस..!


मोठे होत असता आम्ही.. 

एकीकडे लावतेस कडक शिस्त!

तर आमच्या ही नकळत बनतेस 

आमची खासम खास दोस्त..!


निस्वार्थ प्रेमाचा अर्थ तू शिकवतेस..!

सगळं स्वतः सोसून

आम्हाला मात्र नेहमी हसवतेस!


जगातील प्रत्येक गोष्टीला 

एक सुरवात.. एक अंत आहे!..

फक्त आईने आपल्या लेकरावर केलेलं

प्रेम तेवढं "अनंत" आहे..!


नुसता पैसा कामी येत नसतो जगी..

खरा निभाव तेव्हाच लागतो 

जेव्हा असते आपल्याजवळ

आईच्या मायेची शिदोरी..!



Rate this content
Log in