STORYMIRROR

somadatta kulkarni

Inspirational

3  

somadatta kulkarni

Inspirational

देव नाही देवालयी

देव नाही देवालयी

1 min
248

देव नाही देवालयी

वसतसे हृदयांतरी

देव नाही मंदिरी

शोधावा मन मंदिरी


देव दिसें चराचरी

देव सागरी आकाशी 

देव भरला ठाई ठाई

देव आहे आई पाशी


नाही धनाचा भुकेला

भक्तांसाठी धावला 

प्रेमाचा असे भुकेला

भक्तात लीन झाला


देवाची तऱ्हा न्यारी

सोडूनिया स्वर्ग सुख

पाहण्या भक्ताचे मुख

आला भक्ताच्या दारीं


देव नाही देवालयी

देव अंतरंगी शोधावा 

दीन गरीबात पहावा

तरीच सापडेल बरवा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational