देऊळ बंद
देऊळ बंद
का देऊळ बंद झाले?
शोधू कुठे देवपण
देवा कसली परीक्षा
फेडण्यास तुझे ऋण
घेई मना तुझे धाव
पाहण्यास तुझे रुप
कुठे ओवाळू प्रसाद
आठवण येई खूप
न कळत पाय चाले
तुझ्या दारावर पुढे
चुकूनी वळले तिथे
आश्रमाच्या घराकडे
तुझे रूप नाही तिथे
दिसली देव माणसे
करुनी त्यांची ही सेवा
तुझे ऋण मी फेडते
खरा देवधर्म कळे
मला माणूसकीतून
का देऊळ बंद झाले
दिसे सेवा धर्मातून
