देशभक्ती कविता
देशभक्ती कविता
साऱ्याच देश देशाहून सुंदर असा
प्राणाहुन प्रिय भारत देश माझा
कोटी कोटी प्रणाम करितो आम्ही
स्वीकार आमचा प्रणाम धरतीमाता
नंदनवन जशी धरती आमची
त्यात फुलली रंगीबिरंगी फुले
विविध भाषा, धर्म, वेशभूषेची
एकात्मतेच्या सुंगधाने धरती दरवळे
सौख्य, समृद्धी देशात नांदती
शांतीचा संदेश जगात घुमतो
हिरव्या शिवारी पिके डोलती
बंधुभावाचे गाणे वारे गातो
शूरवीरांची पवित्र ही जन्मभूमी
बलिदान दिले अनेक वीरांनी
तिरंगा फडकतो अभिमानाने
त्या हिमालय पर्वतावरी
किती महती गावी या देशाची
केले उपकार अनंत आमच्यासाठी
पांग फेडण्यासाठी दे एक संधी
प्राणही पणाला लावू देशासाठी