डोळ्यांत माझ्या भाव नवे...
डोळ्यांत माझ्या भाव नवे...
डोळ्यांत माझ्या भाव नवे,
नवी स्वप्नं, वेध नवे...
पावलांखालची वाटही नवी,
कल्पनांना झळाळीही नवी...
अंधारलेल्या रात्रीचा आसुरीपणा मात्र तोच,
दिव्यातल्या ज्योतीला असलेला विरोधही तोच...
मात्र यावेळी खंबीर आहे माझा निश्चय
बदलून टाकायचेत आज मला सारे आशय
तोडून सारे पाश नि बंधनं,
मला रचायचीय चिता बुरसटलेल्या विचारांची
अन् आहुती टाकायची आहे
माझ्या अस्तित्वावर उठलेल्या प्रश्नांची...
दूर सारून तिमिर, मी प्रकाश जन्मा घालीन...
काळोखाच्या गर्भामधून मी पहाट खेचून आणीन...
