मनातलं...
मनातलं...
मनातलं ओळखता येत नाही म्हणून कुणी अर्ध्या वाटेत एकटं सोडून जातं का वेड्या
सारेच कसे असतील रे तुझ्यासारखे मनकवडे,
साऱ्यांनाच कसं जमायचं,
डोळ्यांवरून मनाचा आलेख काढणे
पण म्हणून सोबत काढलेलं स्वप्नचित्र
मी एकटीने रंगवायचं?
तुला गोळा करायला आवडणारं निरभ्र आकाश
मी एकटीने साठवायचं?
कधी जमलंच तर उघडून बघ तुझ्या हृदयाचा तो कप्पा,
जो बंद आहे जगासाठी
तिथे सापडतील तुला तुझे-माझे मूकसंवाद,
एकमेकांशी बोलणारी आपली स्पंदने,
तुला कधीच न कळलेले इशारे
नि नाजूक क्षणांचे मोहक उसासे
अन् न सांगता तुला उलगडलेली मी
तुझ्या प्रतिक्षेत असेल त्याच अर्ध्या वाटेवर

