प्रितीरंग
प्रितीरंग
बहाव्याचा फुलोर तू,
रेशमाची डोर तू,
नयनीचं काजळ माझ्या
चोरणारा चोर तू...
श्रावणाची सर तू,
आनंदाचं घर तू,
ओठांवर अडखळून
ओथंबलेला स्वर तू...
सांजवाऱ्याचा गंध तू,
वेड्या मनाचा छंद तू,
या प्रेमळ पाशात हृदयाला
बांधणारा बंध तू...
हवाहवासा संग तू,
जराजरासा दंग तू,
प्रितीच्या रंगी हृदयाला
रंगवणारा रंग तू...
नजरेचा ध्यास तू,
सुगंधाची रास तू,
सुखद क्षणी घेतलेला
मोकळासा श्वास तू...

