सरी
सरी
वाटतं या क्षणाला इथेच थांबवावं
नि स्वतःला फक्त तुझ्यातच भिजवावं,
तुझ्या सरींनी माझ्या केसांमधून झरावं,
चेहऱ्यावरून ओघळून ओठांवर बागडावं...
तुझ्या थेंबाना मी ओंजळीत गोळा करावं
नि हळुवार तुला स्वतःत साठवत जावं,
मी कायम तुझी वाट बघत बसावं
नि तू माझ्यासाठी सुगंध घेऊन यावं...
माझ्यासाठी तू रिमझिम बरसावं,
माझ्यासाठी तू इंद्रधनू फुलवावं,
ताऱ्यांचं चंदेरी जाळं माझ्यासाठी विणून
माझ्याही नकळत मला कवेत घ्यावं...

