ढग, ढगा, ढग्या!!!
ढग, ढगा, ढग्या!!!
ढग, ढगा, ढग्या
काळ्या काळ्या ढगा, ढग्या
सावळ्या सावळ्या, ढग्या
ढवळ्या ढवळ्या, ढग्या
गोल गोल, ढग्या
ढोल ढोल, ढग्या
जाड्या जाड्या, ढग्या
रड्या रड्या, ढग्या
आई तुझी अग्गोबाई, ढग्या
ताई तुझी ढग्गोबाई, ढग्या
दादा तुझा भागुबाई, ढग्या
तु आहेस रडूबाई, ढग्या
कधी चांदोबाला लपवतोस, ढग्या
कधी हरिणांच्या गाडीत बसतोस, ढग्या
कधी हत्ती एवढा अगडबंब, ढग्या
कधी कासवाच्या मागे पडतोस, ढग्या
करतोस किती गडगडाट, ढग्या
घाबरून करते मग वीज कडकडाट, ढग्या
पडतो ना मग पाऊस रपरपाट, ढग्या
माझा होतो ना थरथराट, ढग्या
तरीही खूप आवडतोस, ढग्या
लाडका पाऊस पाडतोस, ढग्या
गवता फुलांना वाढवतोस, ढग्या
राहू दे तुझी माझी अशीच गट्टी, ढग्या

