STORYMIRROR

Arun V Deshpande

Romance

2  

Arun V Deshpande

Romance

चुकले असेल जरा

चुकले असेल जरा

1 min
3.0K


चुकले असेल जरा असे रुसायचे नाही

हास ना रे तू जरासा मज करमत नाही .... ।।

चित्तवृत्ती फुलुनी येता मन सारे खुलुनी आले 

नजरेत तुझ्या परी ते काहीच उमटले नाही

हास ना रे तू जरासा मज करमत नाही …!

वचने ही कितीदा दिली ,घेतल्या आपण शपथा ही 

नादात अजुनी तू तुझ्या प्रेमाचा तुज विस्वास नाही 

हास ना रे तू जरासा मज करमत नाही …!

अडथळे आणिते जग दोन जीवांच्या भेटीसाठी 

होतो कासावीस जीव किती मग तुज भेटण्या साठी 

चुकले असेल जरा असे रुसायचे नाही..

हास ना रे तू जरासा मज करमत नाही …!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance