STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Tragedy

4  

swati Balurkar " sakhi "

Tragedy

चुकीची वेळ

चुकीची वेळ

1 min
370

डोळ्यातले अश्रू सांगतात

काय होतं, नातं तुझं-माझं 

दूर गेलास तर आठवायचं नाही

असं ठरलं नव्हतं, तुझं-माझं!


ठरलेल्या गोष्टी तू मात्र 

पाळल्यास कटाक्षाने,

मी मात्र कोलमडले

नसलेल्या तुझ्या विचाराने!


माझ्या डोळ्यात अश्रू येतात

अगदी तुझ्या आठवणीनेही!

तू मात्र निर्विकार, तटस्थ होतास

प्रत्यक्ष माझ्या दर्शनानेही!


झाला तो भाग्याचा खेळच होता,

चूक कुणाची? फक्त नशिबाची होती!

आयुष्य हा आठवणींचा मेळच होता 

आपण भेटलो ती वेळच चुकीची होती!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy