चला बाळांनो शाळेत
चला बाळांनो शाळेत
चला बाळांनो शाळेत
उठा लवकर सारे
आज शाळेचा दिवस पहिला
लवकरी शाळेत या रे....!! १!!
कित्येक दिवस नाही ऐकला
चिमण्या पाखरांची किलबिल
कोरोनाच्या महामारीत
शाळा झाल्या होत्या सील...!! २!!
आज तो दिवस उगवला
लागा चला तयारीला
मास्क घ्या सोबत आणि
पाणी बॉटल स्वत:ची प्यायला...!! ३!!
सॅनिटायझर ठेवा सोबत
नाक,डोळ्यांना स्पर्श टाळा
चला बाळांनो या रे या
आज सुरू होतेय शाळा....!! ४!!
स्वच्छ सुंदर तुमची शाळा
आहे सज्ज आज स्वागताला
केवढा हर्ष मनी होतोय
शाळेच्या प्रत्येक भिंतीला...!! ५!!
फळा आतुरला वाट पाही
सुरक्षित तुम्ही अंतर ठेवा
एका बेंचवर एकजण बसा
नेहमी नेहमी हात धुवा....!! ६!!
हात मिळविणे टाळा आता
नका वस्तूंची देवाणघेवाण करू
सारे नियम सखोल पाळा
आज होतेय शाळा सुरू....!! ७!!
सर्दी,खोकला आणि ताप
असेल कुणी जर आजारी
शाळेत येणे त्वरीत टाळा
निरोप देत जा ना शेजारी....!! ८!!
चिमण्या पाखरांना खूप शुभेच्छा
स्वागताला तुमच्या सज्ज आम्ही
शाळेचा आज पहिला दिवस
नियम सारे फक्त पाळा तुम्ही...!! ९!!
