चल सोडून जाऊ
चल सोडून जाऊ
चल सोडून जाऊ जग
आपलं जग घडवायला
आता काय बाकी राहिलंय
इथे जीवन जगायला || 0 ||
इथे प्रेम हृदय या गोष्टींना
मुळीच थारा नाही
आधार देईल प्रेमिकांना
असा इथला वारा नाही
अजून काय बाकी आहे
इथे पाय डगमगायला
आता काय बाकी राहिलंय
इथे जीवन जगायला || 1 ||
कोणी साथ देत नाही
पाठ फिरवतात सर्व इथे
काय असा केला गुन्हा
सर्व आपली जिरवतात येथे
अजून काय बाकी आहे
आपल्याला अडवायला
आता काय बाकी राहिलंय
इथे जीवन जगायला || 2 ||
खरं प्रेम करणाऱ्याला
समाज इथे वाळीत टाकतो
खऱ्या प्रेमाची इथे
परीक्षाच मागतो
अजून काय बाकी आहे
बहिष्कार मढवायला
आता काय बाकी राहिलंय
इथे जीवन जगायला || 3 ||
लचके तोडायला मनाचे
सर्व इथे धावतात
मेंदूला प्रेमिकांच्या का
श्वानासारखे चावतात
अजून काय बाकी आहे
फासावर चढवायला
आता काय बाकी राहिलंय
इथे जीवन जगायला || 4 ||
जडला जीव तुझ्यावर
साथ तू दिलीस मला
कोणी इथे नाही आपल्या
मदतीला धावला
स्वप्न अधुरं राहील
जीव जडवायला
आता काय बाकी राहिलंय
इथे जीवन जगायला || 5 ||
प्रेमी जोड्यांचे अश्रू
यांना खूप भावतात
उध्वस्त करण्या जीवन त्यांचे
हे सर्व धावतात
अजून काय बाकी आहे
आम्हा रडवायला
आता काय बाकी राहिलंय
इथे जीवन जगायला || 6 ||

