STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Inspirational

3  

sarika k Aiwale

Romance Inspirational

चित्ती येता तू

चित्ती येता तू

1 min
306

आभास हा तुझा जीव जाळी

भास होता तो मना जग भाळी

सांज एकली उरी चित्त होई वैरी

विचार तुझा मनाला माझ्या छळी

भावनेस या खुळा छंद  जडी

नजरेस पडता येई लाज गाली

चित्त गुंतले की तुझ्यातच मी

चित्ती यावे तू क्षणात हरावे मी

मनात आसपास तुझाच वावर

क्षण न क्षण गुंजन मधाळ स्वर

भान हरपते निशा पहाटेत विलीन

चित्ती येता तू हरावे स्वत्वाचे मखर

कावरी बावरी शमा निःशब्द नजर

तुझ्या मनी येण्याचा हाच असर

मेघासवे गारवा भारवते जणू मन

चित्ती तू रेंगाळता गीत येई ओठावर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance