STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational Others

4  

Vasudha Naik

Inspirational Others

छत्रपती

छत्रपती

1 min
195

जिजाबाई,शहाजींचे

पुत्र अतीव लाडाचे

स्वराज्याचे स्वप्न उरी

 स्वप्नी पाही कायमचे .....


स्वाभीमानी महाराज

सार्‍यांच्याच अंतरात

उतरले छत्रपती

वास असे ह्रदयात.....


सदगुण याची खाण

उंच ठेवी जगी मान

आठवूया हा प्रताप

मराठ्यांची राजा शान....


तेजःपुंज व्यक्तीमत्व

स्फुर्तीमनी जागवते

स्वराज्यासाठीच लढे

हत्ती बळ संचारते.....


सर्व हो गुणसंपन्न

 संस्कारांचा अधिपती

मावळ्यांचा होता देव

राजा शिव छत्रपती......


स्त्रियांच्याच सन्मानाची

शिस्त अती शिवबांची

मंदीर,मस्जिद,सारे

तमा केली देवतांची.....,


गड ,किल्ले हो जिंकूनी

सलामीच स्वराज्याची

स्वप्न सत्य माऊलीचे

गाणी गावी शिवबांची....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational