Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

कपिल राऊत

Inspirational

4.7  

कपिल राऊत

Inspirational

छत्रपती शाहु..!

छत्रपती शाहु..!

1 min
486


प्रिय शाहु,

आहेसच तू मोठा समाज परिवर्तक

तुझ्या या डोळ्यातच 

अख्ख्या जगाचं तत्त्वज्ञान भरलं आहे शाहु..!


उगाच कोणी तुला 

तत्त्वज्ञानी म्हणत नाही

तुमची तुलनाही समाज सुधारक 

म्हणूनच केली जाते हो शाहु..!


कदाचित कळला असता हा परिवर्तनाचा शाहु

या व्यवस्थावादी विचारधारेला तर 

केवळ जयंतीपुरता 

मर्यादित राहिला नसता शाहु..!


पण सांगावंस वाटतंय तुम्हाला की,

या जगाला तुमच्या विचारांची

तुमच्या कार्याची गरच नेहमीच भासत राहील

तुमच्या विचारातच आहे समाज परिवर्तन शाहु..!


तुमचा सुधारणावाद खुपला असेल अनेकांना

असो, तुझ्या रुबाबदार मिशीच्या केसाएवढं 

तत्त्वज्ञान समजून घ्यायलाही 

तेवढाच समजदारपणा लागतो हेही खरं शाहु..!


बाबासाहेबांसोबत तुझी दोस्ती म्हणजे

विचारांचा विचारांशी स्पर्श

तुम्ही इथे जन्मला असताना

तुलाही नाकारलं या व्यवस्थावादी विचारांनी शाहु..!


तू केलेल्या कार्याची जाणीव

हू बहुजन समाजाला 

नक्कीच प्रेरणादायी आहे शाहु..!


माझा देशही केव्हाच शाहुमय होऊन 

तुझ्यासारखाच तत्त्वज्ञानी म्हणून 

ओळखला गेला असता

पण गुरफटलोय आम्ही दगडाच्या अंधःकारात शाहु..!


असे तुम्ही भारतामध्ये 

तत्त्वज्ञान पेरलं 

समाजसुधारणा केली 

व्यवस्था परिवर्तन केलं

आणि सर्वसामान्य जनतेनी ते स्वीकारलं शाहु..!


आरक्षणाचा जनक म्हणून तुमचं

आजही नावं घेतलं जातं

पण, त्याच आरक्षणाचा अर्थ

अजूनही येथील भल्याभल्यांना

कळला नाही शाहु..!


छ्त्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..!


Rate this content
Log in