STORYMIRROR

Bhavana Gandhile

Inspirational

3  

Bhavana Gandhile

Inspirational

छंद

छंद

1 min
250

कला अंगणी चालला 

माझा जीवन प्रवास 

छंद मनास निराळे 

गोड त्यांचा सहवास 


चित्रकार होऊनिया 

कधी खुलवी मी रंग 

संगीताच्या स्वरामध्ये

मन राही सदा दंग


कधी जुळतात स्वर 

गीत उतरते ओठी

लयबद्ध ताण सारे

हर्ष राही मनाकाठी


कधी होऊनिया कवी 

साज शब्दरूपी पाही 

कधी क्रुर दुःखातून

सांडे लेखणीची शाही 


मानवाच्या हक्कासाठी 

लेख जन्मतो मनात 

विचारांचे बांध नवे 

इथे घडती क्षणांत


गोड जीवनात अशा

कमी कशाचीच नाही 

डोई राहो आशीर्वाद 

बाकी नको मज काही 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational