STORYMIRROR

Bhavana Gandhile

Others

3  

Bhavana Gandhile

Others

नाते हे जन्मांतरीचे

नाते हे जन्मांतरीचे

1 min
306

नाते हे जन्मांतरीचे

धरा पावसाचे झाले..!!

भेटण्यास अवनीला

मेघ भरूनिया आले..!!


वीज तापली ढगांत

उधळला शुभ्र चुरा..!!

कसा पाऊस प्रेमाला

ऋतू पडतो अपुरा..!!


कृष्णरंगी मेघ जणू

राग मल्हार गातात..!!

थेंब स्पर्शून धरेला

तृप्त करून जातात..!!


धरा लाजून गालात 

मिठी थेंबाला मारते..!!

प्रेम मिलन करून

दूर विरह सारते..!!


फक्त प्रेमासाठी असे 

त्याचे अवेळी भरणे..!!

कुठे जमते साऱ्यांना

प्रेम अतुट करणे..!!


Rate this content
Log in