कवितेच्या विश्वात
कवितेच्या विश्वात
1 min
211
कवितेच्या विश्वात
आता मी सहज रमते..!!
तिला भावना ओळखणे
आता बरोबर जमते..!!
कधी न सुचले शब्द जरी
तरी ती आठवत देते..!!
माझी कविता प्रेमळ
मज अलवार जवळ घेते..!!
प्रेम असो वा असो यातना
ती नानारूपी नटते..!!
रोजच्याच जीवनात मला
किती नव्या रूपाने भेटते..!!
माझ्या भावनेला अर्थ
तिच्यामुळेच मिळतो..!!
प्रत्येक कवीतेतून कवी
किती अलवार कळतो..!!
आपली व्यथाही कधी
दुसऱ्याला आपली वाटते..!!
कविताच ती जी अलगद
सहज ओठांकाठी साठते..!!
