गणराया
गणराया
1 min
262
तेज रूप तुझे मनोहर
वाटे मज मोरया..!!
माथी मुकुट रत्नजडित
कृष्णवर्णी तुझी काया..!!
चंद्रनयनी भाव मधूर
सिंदूर मर्दन विश्वेश्वरा..!!
हाती वज्र, शंख, सुदर्शन
नमन विद्येच्या परमेश्वरा..!!
सकळ कार्याचा आरंभ तू
विद्यापती तू गौरीनंदन..!!
टिळक शोभे भाळी सुंदर
शीत सुगंधी सौम्य चंदन..!!
दुःख निवारक मोक्षदायक
शिवसूत तू गजानना..!!
भाव अगोचर औदार्याचा
साज रूपाचा भूलवी मना..!!
स्वागत गणराया तुझे करता
चर्तुदळासम फुलले मन..!!
धूप दिव्यांनी सुशोभित घर
मनोहर वाटे प्रत्येक क्षण..!!
