होळी
होळी
1 min
163
षडरिपूचे करू या
होळी अग्नीत दहन,
यातना टाकू धुवून
दुःखाचे होईल वहन.
जळमटे निराशेची
झटकून टाकू सारे,
नव आशा देतील
होळीचे तेज निखारे.
मग येईल नवउर्जा
सण पुरणाचा होईल.
एक एक रंग नवा
अर्थ जीवनास देईल.
फाल्गुनात फुलणारा
रम्य रंगाचा पिसारा,
होळी, धूलिवंदन आणि
रंगपंचमीचा खेळ सारा.
हसू खेळू आनंदाने
नवरंगी रंगून जावू,
प्रेम उधळू नभात
रंग गालावर लावू.
