जर नसती ती तर
जर नसती ती तर
1 min
149
तिच निर्मिती सृष्टीची
कुटुंबाचा शौर्य कणा
लढत राहते जीवनी
काळ असो नवा जुना
एकाच जन्मी असते
अनेक तिचे रूप
माय मायाळू लेकराची
तेज शक्ती स्वरूप
आई वडीलांच्या जीवनी
होई जगण्याची आस
नव जगातील उत्पतीचा
तिच एकमेव श्वास
स्त्री जर नसती ती तर
नसता समाज सारा
वाहिला असता अथांग
जीवनी निराशेचा वारा
