अवकाळी पाऊस
अवकाळी पाऊस
1 min
249
ढग भरले पाण्याने
वाहतोय थंड वारा
नाद ढगांचा मधूर
काळा आसमंत सारा
राग मल्हार छेडता
पर्ण सळसळी छान
थेंब थेंब बरसता
उमटले प्रेम गान
धरा मिलनास त्याने
रंगविला हा सोहळा
अवकाळी हा पाऊस
मना वाटे किती भोळा
सरी झेलताना अंगी
सुख थाटले मनात
चिंब करून धरेला
दव टाकले पानात
