STORYMIRROR

Bhavana Gandhile

Others

4  

Bhavana Gandhile

Others

माय मराठी

माय मराठी

1 min
332

शब्द तोडके मोडके 

उच्चारता गंध झाले..!!

माय भाषा जपताना

भाव गोडव्याचे आले..!!


ओंजळीत शब्दमोती

मुखी गोडवा अपार..!!

कवितेच्या शिंपल्यात

माय मराठीचे सार..!!


संत कवींच्या हृदयी 

अक्षरांचा अभिमान..!!

दूर डोंगरी सजले

माय अमृताचे गान..!!


शिळा भाळी गुंजतोय 

मातृभाषेतील नाद..!!

पानोपानी उमटते

मराठीचे पडसाद..!!


माय मराठी आमुची

मज तिचा अभिमान..!!

सान पान सह्याद्रीचे 

गाते वीरतेचे गान..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन