छिन्न विछिन्न प्रेम
छिन्न विछिन्न प्रेम
आयुष्य किती बेचव झाले
सगळे रंग आज फिके पडले
गंज पडल्यासारखे मने झाली
कोणतीही आशा नाही उरली
आलेला दिवस ढकलत काढायचे
इच्छांना दाबून फक्त जिवंत राहायचे
जीवनातील मनोरंजकता निघून गेली
मने अशी उदास उदास होऊन गेली
वर्षानु वर्षे असेच जीवन लोटत गेले
पण नात्यात परिपक्वता नाही आले
आजही मनाचे, हृदयाचे तुकडे तुकडे होते
जेव्हा डोळ्यातले प्रेम छिन्न विछिन्न अवस्थेत दिसते
काळजा वर पडणारे घाव सोसवत नाही
कोणासाठी जगू खरंच समजत नाही
