छेडल्या तारा - भाग 2
छेडल्या तारा - भाग 2
त्यावर तिने किंचितसे हसून, "मिहिका", असे उत्तर दिले.
त्यावर वरूण म्हणाला," वाह छान आहे नाव अगदी तुम्ही आता जे गाणं गुणगुणतं होता त्या ईतकेचं. मी या कॉलेज मध्ये चं आता लास्ट इअर ला आहे BBA च्या आणि तुम्ही?? "
त्यावर ती म्हणाली,
" मी पण BBA चं करतेयं. मी सेकंड इअर ला आहे ",
यावर वरूण म्हणाला,
" अरे वा ..!! म्हणजे मी सिनियर आहे तुम्हाला. माझं सगळं आता ऐकावं लागेल. "
यावर मिहिका म्हणाली,
" म्हणजे?? ",
हसतं हसतं वरूण म्हणाला," अहो गंमत केली मी अशीचं. चला भेटुया मगं कधीतरी असेचं तुमचे गाणे ऐकायला.. बाय! ",
एवढे बोलून वरूण तिथून निघाला,
मिहिका ने ही हसून," बाय ", म्हटले, आणि ती त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे बघतं राहिली एकटक.
तो गेल्यानंतर ही मिहिका कितीतरी वेळ त्याचा चं विचार करतं राहिली. गिटार वर एखादी तार छेडावी आणि अधीरांनी मगं शब्दांना छेडावे, असे काहीसे झाले होते तिला आजं. तिच्या स्वच्छंदी आयुष्यातं तिला झेप घेण्यासाठी कोणीतरी पंख घेऊन आले होते जणू.
मग काय नंतर कॉलेजमध्ये मिहिका आँडिटोरियम व्यतिरिक्त ही कधी कॉलेज च्या त्या कट्ट्यावर, तर कधी कँटीन मध्ये ही दिसू लागली. वरूण सोबत गप्पा मारताना तिला हे सतत जाणवायचं की, तो खूप वेगळा आहे आपल्यापेक्षा, त्याचे विचार सुद्धा, पण तरीदेखील मिहिका ला ते सर्व आवडायचे. कधी गाणं ऐकण्याच्या निमित्ताने तर कधी कॉलेज मध्ये अभ्यासाच्या निमित्ताने दोघांचे वारंवार भेटणे होत चं रहायचे. मिहिका ला वरूण अगदी पहिल्या नजरेतं आवडला होता खरेतरं, त्याच्या त्या लाघवी बोलण्यांवर ती भाळली होती. इकडे वरूण चे ही अगदी तसेचं काहीसे झाले होते,पण पुढाकार घ्यायला कोणी चं तयार नव्हते. वारंवार होणाऱ्या त्या भेटीगाठी आता रोजं होतं होत्या. कँटीन मध्ये गप्पा मारण्यात, बाहेर फिरण्यात वर्ष अगदी अलवारं निघून गेले आणि दोघांच्या ही परीक्षा सुरू झाल्या.
या दरम्यान मात्र दोघांची भेट काही झाली नाही. दोघांचा अभ्यास सुरू होता एकीकडे, परंतु न राहून एकमेकांंची येणारी आठवण, एकमेकांची असणारी ओढं त्यांना त्यांच्या मधल्या प्रेमाची जाणीव करून देतं होते. परीक्षेच्या काळात त्यांची एकदा ही भेटं नाही झाली, परंतु परीक्षेच्या शेवटच्या दिवशी ते आवर्जून भेटले. पण यावेळी या भेटीमध्ये काही तरी विशेष होते, एक नवखेपण होते. आजं कँटीन मध्ये प्रथम एवढी शांतता होती दोघांमध्ये. काहीतरी बोलायचं म्हणून मिहिका ने चं सुरुवातं केली,
"वरूण परीक्षा कशी झाली??पेपर कसे गेले..??",
यावर वरूण म्हणाला,
"मिहिका.. गरजेचं नाही आहे गं, की दोन व्यक्तींमध्ये शांतता असेल तर काहीतरी बोलावे चं असे.",
यावर मिहिका फक्त, "हसली", आणि पुन्हा त्या दोघांमध्ये एक गुढ शांतता होती, मध्ये मध्ये कॉफी पिताना एकमेकांशी होणारी नजरभेटं सोडली तर. ही शांतता खूप अनामिक पण अल्हाददायक होती.
"ये मुलाकात एक बहाना है ",
ही कँटीन च्या मालकाची फोन ची रिंगटोन या दोघांमधील शांततेला चीर फाडून गेली. दोघांनी ही पुन्हा एकमेकांकडे पाहिले, नजरानजर होता चं मिहिका ने लक्ष वळवण्यासाठी सहज फोन कडे पाहिले आणि फोन वरची वेळ पाहून ती,
"वरूण.. मी निघते.. खूप उशीर झालायं. नाहीतर आईचा फोन येईल आता", असे म्हणून ती पटकन तिची बॅग हातांत घेते आणि त्याच्या उत्तराची वाटं न पहाता, जायला निघते.
पण ती पुढे जाताना चं वरूण तिच हात पकडतो आणि मिहिका मागे वळून पहाते. बस्स जे दोघांच्या ही मनांत होते ते नजरेने हेरले होते. आणि अधीरांआधीचं नजरेने प्रेम व्यक्त केले होते. मगं भेटीगाठीं मध्ये रोजं त्यांच प्रेम नव्याने बहरतं होते. त्यांच्या प्रत्येक भेटीमध्ये मिहिका चं गाणं ठरलेले असायचं. दिवस कसे दिवसामागून सरतं होते. वरूण आणि मिहिका चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले होते. वरूण MBA करण्यासाठी लंडन ला गेला आणि इकडे मिहिका तिचे शेवटचे वर्ष आनंदाने, अभ्यास करतं पूर्ण करतं होती. अर्थात कॉलेजमध्ये वरूण ची कमी जाणवायची चं, परंतु रोजं रात्री त्यांची फोन वर होणारी भेटं ते सारं भरून काढायची. आणि या दुराव्यामुळे त्यांच प्रेमं अजून चं फुललं होतं. दिवस, मगं वर्ष ही गेली. इकडे मिहिका ने BBA नंतर MBA केले आणि तिला एका चांगल्या कंपनी मध्ये जॉब मिळाला, तर दुसरीकडे वरूण लंडनहून भारतांत परत आला होता आणि त्याने स्वतःची एक कंपनी सुरू केली होती. वरूण परत आल्यावर दोघेही भेटले होते आणि त्यांच्या भेटी होतं होत्या. आजं मात्र ते दोघे नव्हते आजं त्यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबाची ही भेटं होती. लग्न करायचा निर्णय घेतल्यानंतर दोघांनीही आपल्या आपल्या घरी सांगितले होते आणि आजं म्हणून चं त्यांची ही भेटं पारिवारिक होती. वरूण आणि मिहिका एकमेकांकडे पहांत शांत बसले होते. एकमेकांच्या नजरेतं हरवले होते.
"मिहिका... मिहिका...", हा आवाज ऐकताचं भूतकाळात हरवलेली मिहिका अचानक भानावर आली. आणि तिने मागे वळून पाहिले.
(क्रमशः)

