*||छावा||*
*||छावा||*
पुरंदर किल्लावर
नवसूर्य तळपला
शंभूराजां सारखा
नवरत्न जन्मला ||१||
आईच्या वात्सल्याला
बालपणीच मुकला
जिजाऊंच्या छत्राखाली
छावा मराठ्यांचा घडला ||२||
गोरगरीब जनतेचा
रक्षणकर्ता ठरला
स्त्रीजातीचा तर त्याने
पदोपदी सन्मान केला ||३||
महापराक्रमी भिमकाय
अफाट शौर्याचा
घोंघावणारा झंझावात
प्रचंड ताकदिचा ||४||
फितुरीने फसविले
गनिमांनी कैद केले
निधड्या छातीने
वार ते झेलले ||५||
जीभ कापली, डोळे काढले
अगणित अत्याचार केले
धर्मरक्षणासाठी प्राणार्पण
शिवशंभूने केले ||६||
मोडेन पण वाकणार नाही
मर्द मराठी बाणा असे
सिंहाच्या त्या छाव्याला
त्रिवार आमुचा मुजरा असे ||७||