STORYMIRROR

rekha kale

Others

3  

rekha kale

Others

उषःकाल

उषःकाल

1 min
273

गुलाबी थंडीत शहारून

धरतीची काया थरथरली

दवाने भिजली पर्णफुले

तेजाने उजळून चमचमली !!


रविराजाची अवतरली स्वारी

चौफेर सोनेरी किरणे उधळीत

आगमनासाठी आतुर हर्षात

रोमांचित सृष्टी होवून लज्जित !!


विहंग उडाले आकाशी

चारापाणी शोधण्या पिलाला

गोठ्यात हंबरते कपिला

वात्सल्याने चाटते वासराला !!

 

घरची गृहलक्ष्मी प्रातःकाळी

सडा सारवण करी अंगणी

अवघे चराचर हर्षउल्हासित

नवचैतन्य स्फुरले प्रांगणी !!


दवबिंदूंची लेवुनी माला

आनंदित झाली वृक्षवेली

क्षणिक सुखाचा साज

मोत्यांची उधळण केली !!


क्षणभंगुर आहे अस्तित्व

गगनाला गवसणी घाल

दवबिंदूंसम प्रकाशमय

जीवन सवंगड्या चाल !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन