STORYMIRROR

rekha kale

Others

3  

rekha kale

Others

गंध मातीचा

गंध मातीचा

1 min
154

उन्हाने काहेली

झालीय जीवाची

आसुसली काया

ओढ गारव्याची !!


गुरेढोरे सारी

उन्हात चरत

तृष्णेने व्याकूळ

रानोमाळ फिरत !!


शेत नांगरुन

मशागत होई

पिकवाया मोती

सज्ज काळी आई !!


लागता चाहूल

मृग नक्षत्राची

चातकासारखी

वाट पावसाची !!


झाकळले नभ

सुसाट हा वारा

टपटप थेंब

पावसाच्या धारा !!


गंध मातीचा

दूर पसरला

हर्ष मनोमनी

पाऊस पडला !!


सृष्टी मोहरली

न्हाली पावसात

मृदुगंध सारा

व्यापे आसमंत !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन