बालपण
बालपण
1 min
308
मातेच्या पोटी गर्भांकुर रुजला
नवमासे उदरी रक्तामासाने पोसला
प्रसववेदना साहावुन बाळ जन्मला
नानाविध लिलया करीत तो वाढला !!
बोलण्या, चालण्याचे कौतुक पदोपदी
प्रसन्न हास्य मुखकमलावर सदोदित
त्याच्या नटखट बालक्रिडांनी मोहित
कोडकौतुक लहानथोर सारे पुरवित
बालपण असते मुक्त गगन
स्वछंदि विहारते निरागस मन
कोमल,मुलायम नाजूक काया
भावभावनांचे अनोखे जीवन
भातुकलीचा खेळ भारी रंगतदार
लुटूपुटुची भांडणे होती जोरदार
दादा, बाबा बनती घोडा ऐटदार
बालगीते आणि गोष्टी मजेदार
नाही वेळकाळेचे थोडेसे भान
चिंतामुक्त लहानपण रंगतदार
मनसोक्त आनंद लुटण्या फार
मनमोहक अदाकारीने भरदार
लहानपण निरंतर देगा देवा
निरभ्र आकाशाचे मोकळे रान
ओल्याचिंब भावनांचा कल्लोळ
ईश्वरी देणगीचे राखुया भान
