STORYMIRROR

rekha kale

Others

3  

rekha kale

Others

ज्ञानसूर्य

ज्ञानसूर्य

1 min
135

जोडूनिया कर वंदनाला

नतमस्तक होवु ज्ञानसूर्याला !!धृ!!


अनाथांचा नाथ तो झाला

अन्यायाशी लढण्या बळ दिले दुर्बलांना

अस्पृश्यांना निंदनीय मानता

स्वउद्धारासाठी प्रवृत्त केले दलितांना !!१!!


प्रतिकूलतेवर मात करून शर्थीने

ज्ञानसागर खुला केला जनमाणसाला

तृष्णा भागविण्या तहानलेल्या जीवा

चवदार तळ्याचा सत्याग्रह केला !!२!!


स्वातंत्र्य, समता, बंधुता शिकवणुकीसाठी

राज्यघटना ती निर्मिली देशासाठी

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा

मूलमंत्र दिला सानथोरांसाठी !!३!!


तिलांजली दिली उच्च नीचतेला

समानतेचा संदेश दिधला भूलोकाला

आपल्या अजरामर कार्याने

भारतरत्नाने जगात झेंडा मिरविला !!४!


साहित्याला गुण द्या
लॉग इन