STORYMIRROR

rekha kale

Others

3  

rekha kale

Others

आला हिवाळा

आला हिवाळा

1 min
164

अंगात भरली हुडहुडी

उबदार शेकोटी साथीला

गोड गुलाबी, शृंगारिक

आला हिवाळा आला !!


आरोग्यदायी ॠतू छान

नियमित व्यायाम करूया

सकस आहार घेवुया

निरोगी आयुष्य जगुया !!


हिरवागार शालू नेसून

नटून बसली वसुंधरा

पिके डोलती वाऱ्यावर

सुमनांचा थाट न्यारा !!


धवल धुक्याची दुलई

अवनीवरती पांघरली

दवबिंदूंच्या मोत्यांची

माळ ल्याली वृक्ष वेली !!


उबदार कपड्यांचा स्पर्श

मोहरुन टाके जीवा

सुकामेवा, पौष्टिक आहार

सुदृढ दीर्घायुष्याचा ठेवा !!


Rate this content
Log in