STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Abstract

3  

Mrs. Mangla Borkar

Abstract

चहा म्हणजे

चहा म्हणजे

1 min
192

चहा म्हणजे चहा म्हणजे चहा असतो,


पृथ्वीवरच्या सर्व पेयांचा तो बादशहा असतो ! 

 

तुमच्या माझ्यासाठी, आपणा सर्वांसाठी


आनंदाचा झरा असतो!


चहा केव्हाही प्यावा ------


सकाळी सुस्त शरीरात जोम येण्यासाठी प्यावा ,


संध्याकाळी श्रमपरिहारार्थ प्यावा!

 

थंडीची हुड़हुड़ी घालवण्यासाठी प्यावा,  


घामाच्या धारा वाहत असतानाही प्यावा


पावसाळी कुंद हवेत प्यावा ,


मित्रां बरोबर धमाल करतांना प्यावा.

 

चहा खुशीत असतांना प्यावा, अन् निराश अवस्थेत


तर प्यावाच प्यावा !

चहा जागून अभ्यास करतांना प्यावा, ऑफिस मधे


मीटिंग चालू असतांना प्यावा,


आवडतं पुस्तक वाचता वाचता प्यावा ,आणि


कविता करतांनाही प्यावा !

 

चहा कसाही प्यावा ----


घरातल्या छोट्या कपातून किंवा मोठ्या मगातून,


किंवा टपरीवरच्या प्लास्टिक ग्लासातूनही प्यावा


बशीत ओतून फ़ुर्र करत प्यावा ,किंवा दिवसभर


घोटघोट प्यावा!

 

कमी साखरेचा,वा बिनसाखरेचा प्यावा,


उकळून दाट केलेला बासुंदी सारखा प्यावा


किंवा पत्ती चहा लिंबू पिळून प्यावा,


वेलदोडा, सुंठ घालून प्यावा किंवा नुसताच प्यावा !

 

चहा कुणीही,,केंव्हाही, कसाही, कुठेही, कितीही प्यावा ---

 

कारण चहा हे केवळ एक पेय नसतं ,


ते पृथ्वीवरचं अमृत असतं !!


तुम्हा -आम्हाला सर्वांनाच आवडणारं असतं ....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract