चेहरे व मुखवटे...
चेहरे व मुखवटे...
अवघड असतं
मुखवटे नसलेला चेहरा घेउन जगणं
आभासी मुखवट्या शिवाय
चेहरा अस्तित्व हिन
मुखवटे नसतें तर चेहरे केव्हांच
आत्महत्याग्रस्त झाले असतें.
चेहरा लपवायला मुखवट्यासारखी
जागा नाही
चेहरा उध्वस्त करतो
मुखवटे सांभाळून घेतात
अस्तित्वं दुभंगू नये म्हणून
चेहरे मुखवटा पुढे करतात.
चेहऱ्याच्या रंगभूमीवर
मुखवट्यांचच नेपथ्य
संहिता उत्तम असेल तर
नेपथ्य गौण असतं
चेहरा निष्पाप असेल
तर मुखवटे गौण असतात.
