चैतन्याची गुढी
चैतन्याची गुढी
मानवतेची देई शिकवण
जगाला आमची रुढी,
चला उभारु आजच
चैतन्याची ही गुढी.
गुढी उभारु ज्ञानाची
यशाची, प्रगतीची,
गुढी उभारु समतेची
माया आणि ममतेची.
गुढी उभारु ऐक्याची
बंधुत्व नी अखंडतेची,
गुढी उभारु विज्ञानाची
झेप आकाशी घेण्याची.
गुढी उभारु उज्ज्वलतेची
भारताच्या किर्तीची,
गुढी उभारु प्रयत्नाची
महासत्ता भारताची.
गुढी उभारु दिव्यत्वाची
उच्च ध्येय, प्रगल्भतेची
मानवतेची,मूल्यांची
सर्वधर्मसमभावाची.
गुढी उभारु राष्ट्रहीत
देशभक्तीची ,
बलशाली हा भारत महान
सर्व महान शक्तीची.
गुढी उभारु चैतन्याची
महानतेची,योग्यतेची,
गुढी उभारु जगात साऱ्या
बलशाली भारताची...!
