STORYMIRROR

vaishali vartak

Romance Classics

3  

vaishali vartak

Romance Classics

चांदण्यात चालतांना

चांदण्यात चालतांना

1 min
126

 एक आगळा आनंद चालतांना चांदण्यात

चमकती अगणिक तारे नभीच्या अंगणात

चंद्र चांदण्यांचा चाले खेळ नभी लोभनीय

रुप खुले चंद्रासवे चांदणीचे रमणीय

मंद वा-याची झुळुक गंध दरवळे सुमनांचा 

हातात हात सखीचा मनोहर खेळ चांदण्यांचा

अशा रम्य चांदरात्री  प्रेमी युगल रमले 

भाव हळुच मनीचे  मुग्धपणे उमजले

 प्रकाशित आसमंत  चंद्र तारे गगनात  

चांदण्याची रात्र सारे  घालविती आनंदात 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance