चांद रात
चांद रात


मनी दरवळे केवडा,
रातराणी उमलण्यास आतूर आहे
अजून ही चांदरात आहे...
डोकावतोय चंद्र मनीचा
उरात त्याचा अस्पर्श आहे
क्षितिजाला नक्षत्रांची आरास आहे
अजून ही चांदरात आहे...
झोंबतोय अंगी वारा उधळत गंध,
देहाची अधिरता जागवत आहे
अजून ही चांदरात आहे....
माझ्या चांदण्याला, तू आभाळ व्हावे
कवेत माझ्या विरून जावो
अजून ही चांदरात आहे....
झाडोऱ्यांच्या घनगर्द मुठीतून
चंद्र घरंगळत आहे
सोबतीस चांदण्या शितल आहे
अजून ही चांदरात आहे...
एकटीच मी, मुक्या भिंती
सोबतीला
स्मृतीचे ढग मनात धावत आहे,
पापण्यात स्वप्नाची आस आहे
अजून ही चांदरात आहे...