STORYMIRROR

Jyoti gosavi

Romance Tragedy

4  

Jyoti gosavi

Romance Tragedy

चालली कोण्या राजाची राणी बनून

चालली कोण्या राजाची राणी बनून

1 min
180

आज माझी सखी मोटार गाडीत बसून

 चालली कोण्या राजाची राणी बनून

 मला करते मेसेज परदेशा वरून

 राजा तुझीच मी ना विसरले कधी

 पण आई बापाची इज्जत सांभाळली आधी

 साऱ्या पत्राचा गठ्ठा दिला पाठवून

 भेटवस्तू मात्र संपल्या वापरून वापरून

 चालली कोण्या राजाची राणी बनून


 राजा गुपित हे आपुले ठेव तू जपून 

 आण गळ्याची तुला 

सांगू नको तु कुणा

 जरी केले प्रेम नाही केला गुन्हा

 असा मेसेज केला लॅपटॉप वरून 

राणी गेलीस ग तू 

आण गळ्याची देऊन

आज माझी सखी मोटार गाडीत बसून

चालली कोण्या राजाची राणी बनून


 भग्नमूर्ती मी उभा तुझी वाट पाहून

 किती वर्षे झाली येथे मला उभा राहून

 किती वर्षे झाली तुझी वाट पाहून 

मी जिते कलेवर /नजर तुझ्या वाटेवर

 येशील कधी राणी पुन्हा तू फिरून

 आज माझी सखी मोटर गाडीत बसून

 चालली कोण्या राजाची राणीबनून


 मी ग फाटका फकीर

 नव्हती नशिबाची लकीर

 पण मनाने मी होतो बडा ग अमीर

पुढल्या जन्मात भेटेल तुला कडकडून 

जन्म घेईन पुन्हा त्यासाठी मी मरून 

आज माझी सखी मोटर गाडीत बसून

चालली कोण्या राजाची राणी बनून


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance