STORYMIRROR

samarth ramdas

Classics

2  

samarth ramdas

Classics

बुद्धी दे रघुनायका

बुद्धी दे रघुनायका

1 min
12.5K


युक्ति नाही बुद्धि नाही। विद्या नाही विवंचिता॥ नेणता भक्त मी तुझा। बुद्धी दे रघुनायका॥१॥

मन हे आवरेना की। वासना वावडे सदा॥ कल्पना धावते सैरा। बुद्धी दे रघुनायका॥२॥

बोलता चालता येना। कार्यभाग कळेचिना॥ बहुत पीडिलो लोकी। बुद्धी दे रघुनायका॥३॥

तुझा मी टोणपा झालो। कष्टलो बहुतापरी॥ सौख्य ते पाहता येत नाही। बुद्धी दे रघुनायका॥४॥

नेटके लिहीता येना। वाचिता चुकतो सदा॥ अर्थ तो सांगता येना। बुद्धी दे रघुनायका॥५॥

प्रसंग वेळ तर्केना। सुचेना दीर्घ सूचना॥ मैत्रिकी राखता येना। बुद्धी दे रघुनायका॥६॥

संसारी श्लाघ्यता नाही। सर्वहि लोक हासती॥ वीसरु पडतो पोटी। बुद्धी दे रघुनायका॥७॥

चित्त दुश्चित होता हे। ताळतंत्र कळेचिना॥ आळसू लागला पाठी। बुद्धी दे रघुनायका॥८॥

कायावाचामनोभावे। तुझा मी म्हणवितसे॥ हे लाज तुजला माझी। बुद्धी दे रघुनायका॥९॥

आशा हे लागली मोठी। दयाळुवा दया करी॥ आणीक नलगे काही। बुद्धी दे रघुनायका॥१०॥



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics