STORYMIRROR

Anil Kulkarni

Abstract

3  

Anil Kulkarni

Abstract

बरे झाले..

बरे झाले..

1 min
138

बरे झाले सगळ्यांनीच नाकारलें

स्वतःला घडवता आले

बरे झाले प्रेमाने झिडकारले

दुःखाच्या कविता लिहिता आल्या

बरे झाले संघर्ष करावा लागला

यशोशिखरावर पोहोचता आले

बरेच शिकवून गेली अदृश्य शक्ती

बरीच माणसें माणसांत आली

बरे झाले पुस्तकातले शिक्षण, आरोग्य

जीवनानेच चांगले शिकवले

जे काही होतं ते चांगल्या साठीच

म्हणून मनाची समजूत काढली की

सगळं बरंच असतं.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract