STORYMIRROR

somadatta kulkarni

Inspirational

4  

somadatta kulkarni

Inspirational

बोल अनुभवाचे

बोल अनुभवाचे

1 min
266

बोल अनुभवाचे आहेत माझे साचे

सत्य बोलीन मी सदा आपुल्या वाचे


मिथ्या फसवे बोल हृदयास फार टोचे

आहे सुंदर क्षण, नको वृथा दवडूस ते


फार काही बोलू नये मौन सदा साधावे

मौन शक्तिशाली हेच सर्वथा जाणावे


वीर वाचाळ असतील दूर सर्वथा असावे

एकांतात भक्ती साधे आत्म्यास आठवावे


सगुणाची भक्ती करत रूप अवघे साठवावे

सगुणातून निर्गुण भक्ती मनी नित्य ठसावे


जळी स्थळी काष्टी पाषाणी एकच रूप दिसावे

त्याची भक्ती करता निजानंदात विलीन व्हावे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational