बळीराजा............
बळीराजा............
मातीतून मोती पिकवे
असा माझा बळीराजा
लेकरावानी कुरवाळे शेती
जणू गोड अंतरीचा गाभा.....
धरणी मायेन सधन
पण तरसे पाण्याला
एका एका थेंबासाठी
फिरे अनवाणी रानाला....
रानावनात व्रुक्षांचे
नाव नाही नुरले
डोळयातील पाणी
पिका देण्यास उरले.......
बळीराजाच हे दुःख
सोसवेना माय धरणीला
काळीज हे फाटे तीच
कशी होऊ तत्पर पेरणीला?......
धरणी मायेच्या आकांताने
कास्तकार अस्वस्थ जाहला
घेऊन काठी आपली
देई आधार जणू धरणीला.......
विचार येई मनात त्याच्या
द्यावा जीव धरणीसाठी
पण हिम्मत न हारी राजा
पून्हा उभा राही पेरणीसाठी........
