बळीराजा मी...
बळीराजा मी...
बळीराजा मी
आहे अन्नदाता,
काळी आई हीच
आमची माता...
बळीराजा मी
पाेशिंदा जगाचा,
कष्ट करण्याचा
आहे आमचा साचा...
बळीराजा मी
धनधान्य फुलवताे,
कष्टाच्या शेतात
मेहनतीची गाणी गाताे...
बळीराजा मी
आहे अनेक उपमा,
माझ्या कष्टाला नाही
येथे कुठलीच सीमा...
