बिगारी जीवन
बिगारी जीवन


संसार आमुचा नाही एका जागी स्थीर
मिळेल जेथे काम तेथेच मांडतो संसार
पत्नी असे मज सोबती, मी जाईन तेथे
वाहे घमेली पदरी बांधुनी बाळाचा भार.
लहानपणापासून करतो हे कष्टाचे काम
हलाखीमुळे नाही गवसले शिक्षण फार
पोरका होऊनच मोठा झालो ह्या जगात
दोघांच्या कामाने करु बाळाचे शिक्षण पार.
सुखी रोटी खाऊनी दिवस सारले आम्ही
वण वण भटके माझी प्रिया मज संगतीने
तिळ तिळ तुटे काळीज माझे तिला पाहुनी
उदर निवारा व्हावा देवाकडे एकच मागणे.
असे जगणे देवा तुला शोभते का देणे?
दिनरात काम तरी न मिळे दोन वेळेचे खाणे
असे सतत कष्टमय जीवन जगतो आम्ही
न्याय तरी कोठे मागावा हे न आम्ही जाणे!
दिस येतील दिस जातील वाट पाहे इथून
हाताला चटके,पोटाचे खळगे सोसावे कसे?
माझ्या प्रियेचे व तान्हुल्याचे हाल बघवेना
तरी मज स्वभिमानी जगणे सोडवत नसे.
ह्या मातीशी जुडले आमुचे नाते गोते
अमुचे बाळ ही खेळे माती संगे आनंदाने
वेलीचा झोका, झाडाच्या फांदीवर
पशू,पक्षाच्या संगे बाळाचे बांगडणे.
आम्ही दोघं करू कामधंदा भरपूर
पै पैशाची करू साठवण एकमात्र
शिक्षण देऊ अमुच्या बाळास झक्कास
देवा स्वप्न पूरे कर, बाळ होऊ दे साहेब मात्र.